¡Sorpréndeme!

Jitendra Awhad | ३५ वर्षांत जे नाही घडलं ते ५ मिनिटांत घडलं, असं आव्हाड का म्हणाले? | Politics

2022-11-15 117 Dailymotion

३५ वर्षांच्या राजकीय इतिहासात जे नाही घडलं, ते ५ मिनिटांत घडलं.. तक्रारदार महिलेचा उल्लेख ताई असा करुन जितेंद्र आव्हाडांनी विनयभंगाच्या आरोपावर आपली बाजू स्पष्ट केली. पोलिसांनी त्या व्हिडीओतील माझ्या तोंडातले शब्द ऐकले असते तरी तो गुन्हा दाखल झाला नसता. पण तो गुन्हा कुणाच्या दबावापोटी करण्यात आला हे पाहावंच लागेल, अशा शब्दात आव्हाडांनी त्यांच्यावरील कारवाईचा निषेध केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही भेटणार असल्याचं आव्हाडांनी सांगितलंय.